शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या श्याम राठोडने घेतली जागतिक झेप, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावला पुरस्कार

By सुरेंद्र राऊत | Updated: December 26, 2025 18:54 IST

मायक्रो फोटोग्राफीच्या दुनियेत चमकला श्याम

सुरेंद्र राऊत, यवतमाळ: छंदाला सर्वस्व मानून जगणारी माणसे छोट्याशा गावातून मोठ्या कॅनव्हासपर्यंत पोहोचतात आणि तो अख्खा कॅनव्हासच व्यापून टाकतात. यवतमाळ येथील श्याम उल्हास राठोड या तरुणाने असाच कलेचा प्रवास करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मायक्रो फोटोग्राफीच्या (सूक्ष्म छायाचित्रण) क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचा प्रवास अन्य तरुणांसाठी प्रेरक ठरत आहे.

व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले श्याम राठोड (रा. कारेगाव यावली, ह.मु. काेल्हे-ले-आऊट यवतमाळ) यांनी आपल्या छंदाला ‘क्रिस्टल आर्ट मायक्रो फोटोग्राफी’ या दुर्मिळ कला प्रकारात रूपांतरित करून विज्ञान आणि कलेचा अनोखा संगम साधला आहे. यवतमाळसारख्या भागात अत्याधुनिक मायक्रोस्कोप, ध्रुवीकृत फिल्टर्स आणि रसायने मिळवणे मोठे आव्हान होते. मात्र संसाधनांच्या कमतरतेवर मात करत त्याने स्वतःच उपाय शोधले. मायक्रो फोटोग्राफीसाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी आपला अँस्ट्रोफोटोग्राफी सेटअप विकला.

जुने लेन्स परदेशातून मागवले, कॅमेरा मायक्रोस्कोपला जोडण्यासाठी थ्री डी प्रिंटेड कपलर तयार केला. तर पोलरायझेशनसाठी सामान्य कॅमेरा फिल्टर्स आणि सेलफेन प्लास्टिकचा रिटार्डर म्हणून वापर केला. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल घेण्यात आली आहे. २०२२ मध्ये त्यांना ‘एव्हीडेंट इमेज ऑफ दी इयर अवॉर्ड’, त्यानंतर २०२३ मध्ये ‘रॉयल सोसायटी पब्लीशिंग फोटोग्राफी कॉम्पीटिशन’मध्ये ते उपविजेते ठरले. २०२४ मध्ये त्यांना ‘मोनोव्हीजन अवॉर्ड’ आणि ‘इंडियन सायन्स फेस्टीवल’मधील ‘सायन्स इन फोकस’ पुरस्कार त्यांनी पटकावला. ‘अग्नी’ नावाच्या त्यांच्या छायाचित्राने शुद्धता, प्रकाश आणि आशेचे प्रतीक म्हणून विशेष ओळख मिळवली आहे.

तरुणांसाठी प्रेरक प्रवास

वीज कंपनीत उपकार्यकारी अभियंता म्हणून काम करत, केवळ छंदाच्या जोरावर जागतिक व्यासपीठावर पोहोचलेला हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दृढ इच्छाशक्ती आणि शिकण्याची ओढ असेल, तर लहान शहरातूनही जगाला ‘मायक्रो वर्ल्ड’चे सौंदर्य दाखवता येते, हे श्याम राठोड यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal's Shyam Rathod Achieves Global Recognition, Wins International Award

Web Summary : Yavatmal's Shyam Rathod, an electrical engineer, gained international recognition in micro photography. Overcoming resource limitations, he created innovative solutions, winning multiple awards for his unique blend of science and art, inspiring youth.
टॅग्स :Yavatmalयवतमाळ