इसापूरचा श्याम आता चढून बसला झाडावर

By Admin | Updated: January 9, 2016 02:55 IST2016-01-09T02:55:44+5:302016-01-09T02:55:44+5:30

तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायती अंतर्गत ई-क्लास जमिनीच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्याम गायकवाड हा तरुण आता पंचायत समितीच्या उंच झाडावर चढून बसला.

Shyam of Isapura now climbs on the tree | इसापूरचा श्याम आता चढून बसला झाडावर

इसापूरचा श्याम आता चढून बसला झाडावर

दिग्रस : तालुक्यातील इसापूर ग्रामपंचायती अंतर्गत ई-क्लास जमिनीच्या प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून श्याम गायकवाड हा तरुण आता पंचायत समितीच्या उंच झाडावर चढून बसला. यापूर्वी त्याने पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून वीरूगिरी तर तहसीलदारांच्या कक्षात कोंडून घेतले होते.
इसापूर येथे ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी घेऊन श्याम गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहे. दरम्यान गुरुवारी येथील जागा मोजण्यासाठी तहसील प्रशासनाचे अधिकारी गेले. परंतु त्याठिकाणी वाद झाला. या वादानंतर श्याम दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. परंतु त्याची तक्रार घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी श्याम मारोती गायकवाड पंचायत समितीच्या परिसरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास आला. या परिसरात असलेल्या गुलमोहराच्या मोठ्या झाडावर चढून बसला. त्याच्यासोबत महापुरुषांच्या प्रतिमा, ध्वनीक्षेपक आणि पिण्याचे पाणी आहे. तो ध्वनीक्षेपकावरून आपल्या मागण्या सांगत होता. वृत्त लिहेस्तोवर श्याम झाडावरच चढून बसलेला होता. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी होती. (प्रतिनिधी)

Web Title: Shyam of Isapura now climbs on the tree