दारव्हा येथे ‘शुरा मी वंदिले’ कार्यक्रम

By Admin | Updated: October 22, 2016 01:39 IST2016-10-22T01:39:05+5:302016-10-22T01:39:05+5:30

चैतन्य गृप आॅफ स्पोर्ट आणि माजी सैनिक संघटनेच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता ‘शुरा मी वंदिले

The 'Shura I Wandale' program at Darwah | दारव्हा येथे ‘शुरा मी वंदिले’ कार्यक्रम

दारव्हा येथे ‘शुरा मी वंदिले’ कार्यक्रम

दारव्हा : चैतन्य गृप आॅफ स्पोर्ट आणि माजी सैनिक संघटनेच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता ‘शुरा मी वंदिले’ या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार अनिलसिंह गौतम, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास मुळे, चैतन्य गृपचे गणेश भोयर, माजी सैनिक गौतम सोनोने, वासुदेव रुडे, डॉ.दामोधर लढ्ढा, डॉ.मनोज राठोड आदी उपस्थित होते. उरी येथील आतंकवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील विकास कुळमेथे यांचा समावेश आहे. या शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता कार्यक्रम घेवून चैतन्य गृपच्यावतीने शहिदांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत शहरवासीयांनी ९६ हजार रुपये गोळा केले. या निमित्ताने शुरा मी वंदिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवून शहीद विकास कुळमेथे यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता चैतन्य गृप, महसूल विभाग, माजी सैनिक संघटना, ओंकार निमकर, अनिल लाभशेटवार, सुनील जिरगे, मधुकर सुर्वे, चेतन उरकुडे, सुभाष खाटीक, गणेश जाधव आदींनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The 'Shura I Wandale' program at Darwah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.