‘जेडीआयईटी’चा शुभम संस्कृती महोत्सवात
By Admin | Updated: April 6, 2016 02:38 IST2016-04-06T02:38:58+5:302016-04-06T02:38:58+5:30
दिल्ली येथे आर्ट आॅफ लिव्हींग संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विश्वशांती संस्कृती महोत्सवात येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी...

‘जेडीआयईटी’चा शुभम संस्कृती महोत्सवात
यवतमाळ : दिल्ली येथे आर्ट आॅफ लिव्हींग संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या विश्वशांती संस्कृती महोत्सवात येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम अवझाडे याने सहभाग नोंदविला. जगभरातील १५५ देशातून आलेल्या ८५०० वाद्यवृंदकांसोबत तबला वादनासाठी त्याला निमंत्रित करण्यात आले होते.
चाचणी परीक्षा घेऊन शुभमची या महोत्सवासाठी निवड झाली होती. जगभरातील ३५ लाख नागरिकांची उपस्थिती होती. आर्ट आॅफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विविध देशांचे पंतप्रधान, राजदूत आदी उपस्थित होते. या भव्य कार्यक्रमात शुभमने तबला वादन केले. त्याला गायन व तबल्यासाठी वर्षा इंगोले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)