श्रावण झुला महोत्सव, राधा कृष्ण दर्शन उत्साहात

By Admin | Updated: September 12, 2016 01:23 IST2016-09-12T01:23:32+5:302016-09-12T01:23:32+5:30

येथील लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचतर्फे स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहात राधाकृष्ण दर्शन व श्रावण झुला

Shravan Jhula Mahotsav, Radha Krishna Darshan excitement | श्रावण झुला महोत्सव, राधा कृष्ण दर्शन उत्साहात

श्रावण झुला महोत्सव, राधा कृष्ण दर्शन उत्साहात

वणी : येथील लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचतर्फे स्थानिक जैताई मंदिराच्या सभागृहात राधाकृष्ण दर्शन व श्रावण झुला महोत्सवाला सखींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
राधा-कृष्ण स्पर्धेत प्रथम क्रमांक तन्मय दंतुरवार, तर द्वितीय क्रमांक नमन आबडने पटकाविला. धनश्री टोंगे हिने प्रथम क्रमांक राधा, तर द्वितीय क्रमांक सई दामोधरने मिळविला. प्रोत्साहनपर जागृती पोपलीला मिळाला. श्रावण झुल्यामध्ये झुल्यावरील स्पर्धेत झुला झुलताना बॉल उचलणे स्पर्धेत प्रथम क्रमांक राखी टोंगे, तर द्वितीय क्रमांक अल्का अटाराने मिळविला. मटकी सजविणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मोनिका जयस्वाल, तर द्वितीय क्रमांक विणा देशपांडेनी मिळविला. झुला सजविणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता सोनटक्के, तर द्वितीय क्रमांक निता सप्रेने मिळविला. पानाफुलांची रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक संगिता धनरे, तर द्वितीय क्रमांक लता पांडे व संगिता गुंडावारने मिळविला. कृष्णाची नावे लिहिणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रीका अटारा, तर द्वितीय क्रमांक अनुजा अंदाणीने मिळविला. एक मिनीटमध्ये प्रथम क्रमांक राशी ठाकुरवार, तर द्वितीय क्रमांक वैशाली गाभोळेने मिळविला. लकी गेममध्ये प्रथम क्रमांक वैशाली गाभोळे, तर द्वितीय सविता आबड, तृतीय क्रमांक शर्वरी सरपटवार व चंद्रिका अटाराने मिळविला. हरितालिका सजविणेमध्ये प्रथम क्रमांक जयश्री लिडबिडे, तर द्वितीय स्मिता सोनटक्केने मिळविलला. स्मिता कावडे, प्रियंका जयस्वाल, शर्वरी सरपटवार ह्यांनी परीक्षण केले. अल्का खोंड, छाया कोडगीरवार, निशा अग्रवाल, साधना गोहोकार, निमा जिवणे, विणा देशपांडे, स्मिता केदार, संगीता गुंडावार यांनी सहकार्य केले. भारती सरपटवार यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. राधा-कृष्णाचे बक्षीस राम सरपटवारच्या हस्ते देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Shravan Jhula Mahotsav, Radha Krishna Darshan excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.