शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! मुलाच्या मारेकऱ्याला दोन वर्षांनंतर बापाने संपविले; आर्णी येथील हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 21:21 IST

पाळत ठेवून तलवारीने केले वार

आर्णी (यवतमाळ) : शहरात दोन वर्षांपूर्वी दुर्गा विसर्जन मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोघांनी युवकाचा खून केला. या घटनेनंतर  मुलाला गमावलेल्या बापाच्या मनात सुडाचा अग्नी पेटत होता. मुलाचा मारेकरी न्यायालयाच्या तारखेसाठी आर्णी शहरात आल्याची माहिती मिळताच त्याने पाठलाग सुरू केला. संधी मिळाल्यानंतर शहरातील एका शाळेसमोर तलवारीने हल्ला करून मुलाच्या मारेकऱ्याला ठार केले. हा थरार शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला.ओम गजानन बुटले (२५) असे मृताचे नाव आहे. ओमने दोन वर्षांपूर्वी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत वाद घालून अजय अवधूत तिगलवाड (२२, रा. कोळवन) या युवकाचा खून केला होता. त्यानंतर ओम जामिनावर बाहेर आला होता.  मुलाचा कुठलेही कारण नसताना हकनाक बळी घेतला. याची खंत अजयचे वडील अवधूत सूर्यभान तिगलवाड (५०) यांना होती. मुलाच्या मारेकऱ्याला सोडायचे नाही, या मानसिकतेतून अवधूत ओमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. शुक्रवारी ओमची न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता.

पुणे येथे जाण्याच्या बेतात असतानाच हल्लाशनिवारी सायंकाळी तो पुणे येथे जाण्यासाठी सनराईज शाळेसमोर उभा होता. याच संधीचा फायदा घेऊन अवधूत तिगलवाड याने ओमवर तलवारीने वार केले. ओम जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. प्रवासादरम्यानच ओमचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच अवधूत तिगलवाड याला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रजनिकांत चिलुमुला, आर्णी ठाणेदार सुनील नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात इतरही तिघांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस