कापूस खरेदी विक्रीच्या चौकशीने धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:56+5:30
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.

कापूस खरेदी विक्रीच्या चौकशीने धडकी
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यात नोंदणी करूनही ८०९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विकला नाही. सर्वेक्षणात यातील बहुतांश लोकांच्या घरी कापूस शिल्लक नव्हता, असे आढळून आले. यामुळे तब्बल २५ हजार क्विंटल कापूस सीसीआयला विकून जवळपास अडीच कोटी रुपयाने हात मारल्याचा संबंधितांचा डाव अयशस्वी झाला आहे. आता कापूस खरेदी-विक्रीची चौकशी सुरू झाल्याने अनेकांना धडकी भरली आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर बाहेरच्या तालुक्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी आणि बड्या आसामींचा डाव यशस्वी झाला. कोट्यवधी रुपये यातून खिशात घातले गेले आहे. तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी तीन केंद्रावर नोंदणी केली होती. त्यातील सर्वेक्षणापूर्वी दोन हजार २५७ शेतकºयांनी ५९ हजार क्विंटल कापूस विकलेला होता.
सर्वेक्षणात उर्वरित दोन हजार १७० शेतकऱ्यांचे पैकी ४० टक्के शेतकºयांकडे कापूस नसल्याचे दिसून आले होते. हाच सर्वे आधी व संपूर्ण नोंदणीधारकाकडे झाला असता तर तेवढेच वा अर्धी नोंदणी बोगस सिद्ध झाली असती. सीसीआय, शासनास मोठा फटका बसला नसता. खºया शेतकºयांची कापूस खरेदीही लवकर आटोपून शासन यंत्रणेचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाचला असता.
पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्री
प्रती हेक्टर उत्पादकता तपासून पेऱ्यापेक्षा जादा कापूस विक्री, पेरा नसतानाही पेरा दाखवून कापसाची शासकीय एजन्सीला विक्री, कापूस नसतानाही नोंदणी, नोंदणी नसतानाही शासकीय एजन्सीला कापूस विक्री आदी प्रकरणात सहकार विभागाने चौकशी सुरू केली आहे. कापूस नसतानाही नोंदणी करणाऱ्याविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेले असल्याने शासकीय यंत्रणा विविध माहितीच्या याद्या तयार करण्याच्या कामी लागली आहे.
गैरव्यवहारात अनेकांचा सहभाग
मोठ्या प्रमाणात अनेक महाभाग शेतकऱ्यांच्या नावावर ठिकठिकाणी कापूस विकण्यास यशस्वी झाले. त्यातून त्यांनी व या कार्यात सहकार्य करणाऱ्यांनी आपआपल्या तुंबड्या भरून घेतल्या. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाचेच याबाबत लक्ष वेधले असून चौकशी करून मुद्देनिहाय माहिती मागविली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याविरूद्ध मुंबईत आवाज उचलला असून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.