शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस बाजार समितीत पालकमंत्री संजय राठोड यांना धक्का; मविआचा डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 20:28 IST

महाविकास आघाडीने जिंकल्या १४ जागा : भाजप-शिंदे गटाला चार जागा 

प्रकाश सातघरे दिग्रस (जि. यवतमाळ)  : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील बाजार समिती म्हणून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. पालकमंत्र्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत आपले वर्चस्व अबाधित राखले. राठोड यांच्या गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत. 

दिग्रसमध्ये शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविली. त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) आणि भाजपने रणशिंग फुंकले होते. दोन्ही गटांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पालकमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात हा तालुका येत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. दुसरीकडे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. आतापर्यंत बाजार समितीवर देशमुख यांचे एकहाती वर्चस्व कायम होते. ते अबाधित  ठेवण्यासाठी देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहकार्याने विजयासाठी शर्तीचे प्रयत्न केले. 

मतदानानंतर सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. या आघाडीचे सहकारी संस्था मतदारसंघातून ११, अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक, असे १४ उमेदवार विजयी झाले. विरोधी पालकमंत्री संजय राठोड यांच्या गटाला ग्रामपंचायत मतदारसंघातील केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडAPMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक