जैन भागवती दीक्षा समारोहानिमित्त शोभायात्रा

By Admin | Updated: September 5, 2014 00:07 IST2014-09-05T00:07:59+5:302014-09-05T00:07:59+5:30

येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि श्रद्धानिष्ठ श्रावक भवरीलाल भिकमचंद छलाणी यांची नात आणि अशोक छलाणी यांची सुकन्या मुमुक्षू कविता छलाणी ही जैन भागवती दीक्षा घेत आहे. त्यानिमित्त आर्णी

Shobhayatra for the commemoration of Jain Bhagwati diksha | जैन भागवती दीक्षा समारोहानिमित्त शोभायात्रा

जैन भागवती दीक्षा समारोहानिमित्त शोभायात्रा

आर्णी : येथील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि श्रद्धानिष्ठ श्रावक भवरीलाल भिकमचंद छलाणी यांची नात आणि अशोक छलाणी यांची सुकन्या मुमुक्षू कविता छलाणी ही जैन भागवती दीक्षा घेत आहे. त्यानिमित्त आर्णी शहरातून आज शोभायात्रा काढण्यात आली.
दिल्ली येथील आध्यात्म साधना केंद्रात ५ आॅक्टोबर रोजी जैन श्वेतांबर तेरापंथ संघाचे अनुव्रत, अनुशास्ता, ज्योतीपूंज, आचार्य, नहाश्रमजी यांच्या करकमलाद्वारे कविता जैन भागवती दीक्षा घेणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आर्णी येथे करण्यात आले आहे. गुरुवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शनिवार, ६ सप्टेंबर रोजी मंगल भावना समारोह व गौतम प्रासादी होणार आहे. २८ सप्टेंबरला आर्णी येथून कविता दिल्ली करीता प्रस्थान करणार आहे. भौतिक संसारिक सुखसुविधांचा त्याग करून आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करीत आहे. दीक्षा घेणाऱ्या कविताची आर्णी शहरात शोभायात्रा काढण्यात आली.र् ईश्वर दुग्गड यांच्या निवासस्थानावरून ही शोभायात्रा काढण्यात आली. एका सजविलेल्या रथात मुमुक्षू कविता आणि सोबत भवरीलाल छलाणी विराजमान होते. या शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रा छलाणी यांच्या निवासस्थानी पोहचली. या शोभायात्रेत रमेश सुराणा, प्रवीण दुगड, गोपाल कोठारी, अशोक छलाणी, दिलीप छलाणी, रवी छलाणी, गौतम छलाणी, प्रवीण छलाणी, प्रकाश छलाणी, राजू कोठारी, रवी बोरा, संजय बोरा, सुशिल बोरा, पारसमल जैन, दिनेश झांबड, राजेश लढ्ढा, शंकर अग्रवाल, भिकू पटेल, कांतीलाल कोठारी, कन्हेरीलाल कोठारी, कमलकिशोर बंम, शांतीलाल कोठारी, मुन्नासेठ झांबड आदी असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shobhayatra for the commemoration of Jain Bhagwati diksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.