उमरसरा येथे शिवसैनिकाचा खून
By Admin | Updated: May 24, 2014 00:11 IST2014-05-24T00:11:54+5:302014-05-24T00:11:54+5:30
स्मशानभूमी रस्त्याच्या कामाच्या वादातून शिवसेनेचे उमरसरा सर्कल उपप्रमुख रामनारायण उर्फ दादू इंद्रजित मिश्रा यांचा तलवारीने खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उमरसरा

उमरसरा येथे शिवसैनिकाचा खून
यवतमाळ : स्मशानभूमी रस्त्याच्या कामाच्या वादातून शिवसेनेचे उमरसरा सर्कल उपप्रमुख रामनारायण उर्फ दादू इंद्रजित मिश्रा यांचा तलवारीने खून करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास उमरसरा येथील तीन फोटो चौकात ही घटना घडली. दाते कॉलेज चौकाकडून दादू मिश्रा दुचाकीने जात असताना परिसरातच दबा धरून बसलेल्या दोघांनी धारदार तलवारीने चालत्या दुचाकीवरूनच त्याच्यावर हल्ला केला. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती नागरिकांनी दूरध्वनीवरून वडगाव रोड पोलिसांना दिली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर, शीतल निमकर, पोलीस उपनिरीक्षक नरेश पिंपळकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दादूला तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वर्षभरापासून दादू मिश्रा याचा स्मशानभूमीच्या रस्त्यावरून स्थानिक दोघांशी वाद सुरू होता. या वादातूनच दादूवर प्राणघातक हल्ला झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी संंशयिताची शोधमोहीम राबविली. काही महिन्यांपूर्वी दादूवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून सुदैवाने तो बचावला. दादूवरील हल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या शहर पदाधिकार्यांनी आणि शिवसैनिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. (स्थानिक प्रतिनिधी)