शिवसेना नेतेही पोहोचले पिंप्रीत

By Admin | Updated: June 23, 2015 00:26 IST2015-06-23T00:26:06+5:302015-06-23T00:26:06+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम केलेल्या पिंप्री गावात जणू राजकारण शिरले आहे.

Shiv Sena leader also reached Pimpri | शिवसेना नेतेही पोहोचले पिंप्रीत

शिवसेना नेतेही पोहोचले पिंप्रीत

शेतकरी कुटुंबांचे सांत्वन : चार गावांत दिल्या भेटी, राष्ट्रवादीची टीका
यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्काम केलेल्या पिंप्री गावात जणू राजकारण शिरले आहे. काँग्रेसने या गावातून राज्यस्तरीय आंदोलनाचा शुभारंभ करण्याची घोषणा केली असतानाच शिवसेना नेते दिवाकर रावते यांनीसुद्धा सोमवारी या गावात भेट देऊन शेतकरी कुटुंबाचे सांत्वन केले.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त गावांचा दौरा केला. संबंधित कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हेसुद्धा त्यांच्यासोबत होते. रावते यांनी पिंप्री बु. येथे शांता ताजने या अलिकडेच आत्महत्या केलेल्या शेतकरी विधवेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी लोणी घाटाना येथील बाबूलाल राठोड, घाटंजी तालुक्याच्या घाटी येथील संतोष पांडे, केळापूर तालुक्याच्या घोडदरा येथील माधव गोडे या शेतकऱ्यांकडे भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पीक कर्ज, विम्याची रक्कम व अन्य समस्या मांडल्या. काँग्रेसने पिंप्रीतून सुरू केलेल्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. तर विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपाय सुचविणारी शिवसेना आता त्यांची सत्ता असताना या उपाययोजना का करीत नाही, असा सवाल विचारला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Shiv Sena leader also reached Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.