शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

भाजपाविरोधात शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 05:00 IST

कधी स्मारकाच्या तर कधी मंदिराच्या नावाखाली भाजप नेते देशातील पैसे लुटत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेना  जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपचे झाल्याचे सांगत शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे, हा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणात भाजपावर  टीका केली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत’चे संग्रहालय उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून गुरुवारी करण्यात आली. शिवसेनेने यवतमाळ शहरातील दत्त चौकासह जिल्ह्याच्या विविध भागात या मागणीसाठी निदर्शने केली. दत्त चौकात दुपारी या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांसह भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘भाजप हमसे डरती है, इडी को आगे करती है’ अशा घोषणांनी दत्त चौक परिसर दणाणून निघाला. कधी स्मारकाच्या तर कधी मंदिराच्या नावाखाली भाजप नेते देशातील पैसे लुटत असल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेना  जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्यातील ईडीचे कार्यालय भाजपचे झाल्याचे सांगत शिवसेना नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे, हा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाषणात भाजपावर  टीका केली.  आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, राजूदास जाधव, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, गोपाळ पाटील, संजय रंगे, नितीन बांगर, सचिन राठोड, निर्मला विणकरे, अंजली गिरी, कल्पना दरवाई, गजानन पाटील, विशाल गणात्रा, डॉ. प्रसन्न रंगारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याShiv Senaशिवसेना