पुसद येथे शिवसेना कार्यालयात शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:43 IST2021-04-01T04:43:39+5:302021-04-01T04:43:39+5:30
पुसद : हिंदवी स्वराज्याचे निर्माते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती येथील शिवसेना कार्यालयात साजरी ...

पुसद येथे शिवसेना कार्यालयात शिवजयंती
पुसद : हिंदवी स्वराज्याचे निर्माते, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती येथील शिवसेना कार्यालयात साजरी करण्यात आली.
पापीनवार बिल्डिंग, नवीन पुसद येथे कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम विश्वंभर पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ॲड. उमाकांत पापीनवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सध्या कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर असल्याने व शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी रवी पांडे, मोहन विश्वकर्मा, संतोष दरणे, दीपक उखळकर, अजू चिद्दरवार, गणेश खटकाळे, संदीप लाभसेटवार, गोलू चापके, राजू महाजन, संजय जोगदंड, संजयकुमार हनवते यांच्यासह दिलीप जाधव, नंदू चौधरी आदी उपस्थित होते.