शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शासनाच्या निषेधार्थ मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:41 PM

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

ठळक मुद्देचक्रीधरणे : तिसऱ्या दिवशी पुसदमधील शेतकऱ्यांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येथील तिरंगा चौकात सुरू असलेल्या चक्री धरणे आंदोलनात रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारात पुसद विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दरम्यान, बोंडअळीच्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे गेलाच नसल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आंदोलनस्थळी केला.राज्य विधीमंडळात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने हेक्टरी ३० हजार ते ३७ हजार रूपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत सरसकट व विनाविलंब देण्याच्या मागणीसाठी जिल्हा शेतकरी संघर्ष समिती, काँग्रेस, मनसे, राष्ट्रीय युवा संघटन, शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटना, बेंबळा कालवे संघर्ष समिती आदींनी चक्री धरणे आंदोलन सुरू केले. रविवारी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण करून सरकारचा निषेध केला.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सक्रिय सहभाग घेतला. या प्रसंगी खासदार गवळी यांनी शिवसेना सदैव शेतकरी आणि त्यांच्यासाठी लढणाऱ्यांसोबत असल्याचे सांगितले. सरकारचे धोरण चुकीचे असून लोकसभेत या विरोधात रान उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. तिसऱ्या दिवशी या आंदोलनात पुसद विधानसभा मतदार संघातील शेतकरी सहभागी झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असलेल्या फडणवीस सरकारच्या निषेधार्थ मुंडण केले. कीर्तनकार नंदकुमार माळवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना बोलके करणारे कीर्तन सादर केले.या आंदोलनात रविवारी डॉ. वजाहत मिर्झा, डॉ.मो.नदीम, अशोक बोबडे, प्रवीण देशमुख, अरूण राऊत, अजय पुरोहित, सुधीर जवादे, माधुरी अराठे, दिनेश गोगरकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, जक्की अन्वर, किशोर राठोड, मनमोहनसिंग चव्हाण, प्रभाकर उईके, जियाभाई, सुभाष राठोड, पंडितराव देशमुख, बाळू दरणे, नईम इजारदार, गोपाल राठोड, अमजद बिल्डर, नाने खान, शेख चाँद, समीर शेख रमजान, बळीराम चव्हाण, गजानन चव्हाण, तुकाराम हटकर, अब्दुल सलाम अब्दुल सत्तार, उत्तम पवार, जयश्री देसाई, वीणा नागदिवे, ममता मिश्रा, सुनीता पाटील, मनीषा मेसेकर, शुभांगी गलांडे आदी सहभागी होते.मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेला मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे नाही - गवळीचक्रीधरणे आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा देत सरकार विरोधात हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर केलेल्या मदतीचा प्रस्ताव अद्याप केंद्राकडे मंजुरीसाठी आला नसल्याचा गौप्यस्फोट खासदार भावना गवळी यांनी केला. त्यांनी सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून भांडू आणि लोकसभेतही कलम १९३ नुसार चर्चेसाठी सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही दिली. केंद्राच्या दुष्काळी मदतीसाठी अद्याप राज्याचा प्रस्ताव नाही. बियाणे कंपन्या न्यायालयात जाणार आहे. अशावेळी सरकारने स्वत:च्या खिशातील पैसे शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.