शरद पवार आज घारफळमध्ये
By Admin | Updated: November 4, 2015 02:43 IST2015-11-04T02:43:36+5:302015-11-04T02:43:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्र पवार बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे

शरद पवार आज घारफळमध्ये
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्र पवार बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे बुधवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बाबासाहेब घारफळकर जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.
खासदार शरद पवार यांचे नागपूरवरुन मोटारीने घारफळ येथे आगमन होईल. त्या ठिकाणी रा.ज.उपाख्य बाबासाहेब घारफळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, विद्यालयाचे नामांतरण आणि नवीन विस्तारी इमारतीचे भूमिपूजन केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळकेराहतील. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, खासदार भावना गवळी, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन बाबासाहेब घारफळकर जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि शिवाजी विद्यालयाने केले आहे. (नगर प्रतिनिधी)