शंकरबाबाच्या ‘लाजवंती’ला आज लागणार हळद व मेहंदी

By Admin | Updated: December 10, 2015 02:40 IST2015-12-10T02:40:07+5:302015-12-10T02:40:07+5:30

कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या ओट्यात गवसलेली आणि अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य अपंग मतिमंद बेवारस बालगृहात १०० भावंडात लहानाची मोठी झालेली,...

Shankarbaba's 'Lajwanti' needs turmeric and henna today | शंकरबाबाच्या ‘लाजवंती’ला आज लागणार हळद व मेहंदी

शंकरबाबाच्या ‘लाजवंती’ला आज लागणार हळद व मेहंदी

समाजऋण : सखी मंच सांभाळणार जबाबदारी
यवतमाळ : कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या ओट्यात गवसलेली आणि अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील अंबादासपंत वैद्य अपंग मतिमंद बेवारस बालगृहात १०० भावंडात लहानाची मोठी झालेली, शंकरबाबा पापळकरांची लाडा कौतुकाची १७ वी मानसकन्या लाजवंती शनिवार १२ डिसेंबर रोजी बोहल्यावर चढणार आहे. त्यानिमित्त गुरूवार १० डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० वाजेपर्यंत येथील दर्डा मातोश्री सभागृहात हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम आयोजित आहे.
लोकमत सखी मंच या विवाह सोहळ््यात हळदी व मेहंदीच्या कार्यक्रमाचे सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडणार आहे. सखी मंच परिवार लाजवंतीला हळद लावून तिच्या हातावर भविष्याचे सुंदर स्वप्न मेहंदीच्या रुपात चितारणार आहे. यावेळी वर श्रीराम सरमोकदम आणि त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. मेहंदी आणि हळदीवरील गीते सखी मंच सदस्य सादर करतील. यावेळी नटराज संगीत कला अकादमीचे बाबा चौधरी-किशोर सोनटक्के आणि चमू गीत-संगीत सादर करणार आहे. या कार्यक्रमात बालकांचे नृत्यही होणार असून त्याकरिता यवतमाळ पब्लिक स्कूल सहकार्य करणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी रेणू संजय शिंदे, प्रगती मिलिंद धुर्वे यांचे सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाला सखी मंचच्या सर्व सदस्यांनी लाजवंतीला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)

लाजवंतीला देणार अहेर
सखी मंचच्यावतीने आयोजित लाजवंतीच्या हल्दी व मेहंदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सखी स्वेच्छेने अहेर करू शकतात. ज्यांना अहेर करण्याची इच्छा आहे, त्यांनी केवळ रोख स्वरूपात करावा. कुणीही भेटवस्तू आणू नये. कार्यक्रमस्थळी अहेर स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अहेरस्वरूपात प्राप्त झालेला निधी बचत ठेवीच्या स्वरूपात लाजवंतीला विवाह सोहळाप्रसंगी दिला जाईल.

Web Title: Shankarbaba's 'Lajwanti' needs turmeric and henna today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.