शाहू महाराज जयंती महोत्सव व सत्कार

By Admin | Updated: June 19, 2016 02:21 IST2016-06-19T02:21:39+5:302016-06-19T02:21:39+5:30

महामानव चॅरिटेबल ट्रस्ट आणि आसरा एज्युकेशन विंगच्यावतीने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Shahu Maharaj Jayanti Festival and felicitation | शाहू महाराज जयंती महोत्सव व सत्कार

शाहू महाराज जयंती महोत्सव व सत्कार

यवतमाळ : महामानव चॅरिटेबल ट्रस्ट आणि आसरा एज्युकेशन विंगच्यावतीने २६ जून रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
स्थानिक वैशाली सोसायटीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मार्गदर्शक म्हणून हिंदी विश्व विद्यालय वर्धाचे डॉ. सुनीलकुमार सुमन, पोलीस उपनिरीक्षक शिवकवी ईश्वर मत्ते, मराठा सेवा संघ चंद्रपूरचे बंडू डाखरे आदी लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून मन्सूर एजाज जोश, नरेंद्र गद्रे, शेख महबूब आलम, संतोष जाधव, प्रकाश राऊत, लक्ष्मणराव भिवनकर, के.एस. नाईक आदी उपस्थित राहतील.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती महामानव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हर्षवर्धन ठमके, भूपेश टिपले, सुभाष नगराळे, रवींद्र वासनिक, बिना भगत, विजय भगत, सुगत भगत, विजय राठोड, कमलाकर शेंडे, रमेश कांबळे, पठाण, पृथ्वीराज गजभिये, हरीश रामटेके आदींनी केली आहे. कार्यक्रमासाठी आयोजक संस्थेचे सदस्य पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Shahu Maharaj Jayanti Festival and felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.