उत्तरवाढोणा येथे शहीद किशोर कुणगर स्मृतिदिन
By Admin | Updated: December 16, 2015 02:49 IST2015-12-16T02:49:55+5:302015-12-16T02:49:55+5:30
वीर शहीद किशोर कुणगर स्मृतीदिन व शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील शहीद स्मारकावर गुरूवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.

उत्तरवाढोणा येथे शहीद किशोर कुणगर स्मृतिदिन
मान्यवरांची उपस्थिती : कुटुंबीयांचा सत्कार
सोनखास : वीर शहीद किशोर कुणगर स्मृतीदिन व शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव सोहळा नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील शहीद स्मारकावर गुरूवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे.
दरवर्षी उत्तरवाढोणा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी राहतील. यासोबतच शहीद किशोर यांच्या मातोश्री लीलाबाई कुणगर, सेवानिवृत्त मेजर पांडे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभेदार व्यंकटजी जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, शेतकरी सहकारी सूतगिरणी बोरीअरबचे उपाध्यक्ष परमानंद अग्रवाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील जैत, नेरचे नगराध्यक्ष पवर जयस्वाल, अनुताई राठोड, भरत मेश्राम, माधुरी शेटे आदीसह इतर मान्यवरांची सुद्धा प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
याच कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांना धीर देऊन आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधनकार संदीप पाल महाराज यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तरवाढोणा येथील सरपंच उज्वला गुरड व उपसरपंच निरंजन लांजेवार यांनी केले आहे. (वार्ताहर)