‘जेडीआयईटी’चे शहाडे यांना पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:13 IST2018-02-06T23:12:44+5:302018-02-06T23:13:18+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.मकरंद शहाडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगमधील ‘अ रिलायबल पॉवर रुटींग स्किम फॉर मोबाईल अॅड-होक नेटवर्क’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.

‘जेडीआयईटी’चे शहाडे यांना पीएचडी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.मकरंद शहाडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगमधील ‘अ रिलायबल पॉवर रुटींग स्किम फॉर मोबाईल अॅड-होक नेटवर्क’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. यासाठी त्यांना अमरावती विद्यापीठाच्या बोर्ड आॅफ स्टडीज कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंगचे चेअरमन प्रा.डॉ.व्ही. एम. ठाकरे, जेडीआयईटीच्या कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.डॉ.दिनेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाचे संस्था सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ.अविनाश कोल्हटकर यांनी कौतुक केले.