गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST2021-09-19T04:42:56+5:302021-09-19T04:42:56+5:30

महागाव : मराठा सेवा संघाच्या महागाव तालुका शाखेने गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. ...

Shabbaski's pat on the back of the meritorious | गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप

महागाव : मराठा सेवा संघाच्या महागाव तालुका शाखेने गुणवंतांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.

संघातर्फे वृक्षारोपण, गरजूंना धान्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहावीत गायत्री गजानन नरवाडे आणि बारावीत हर्षल विठ्ठल वाघमारे यांनी घवघवीत यश मिळविले. त्यांच्या हस्ते मोक्षधामात वृक्षारोपण करून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मसानजोगी समाजातील पुष्पा आणि संजय उपेवाड या दांपत्यास साडी, चोळी, कपडे व धान्याची कीट देण्यात आली.

कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष उदय नरवाडे, डॉ. संदीप शिंदे, अमोल जगताप, आशिष गावंडे, पंकज देशमुख, मनोज भरवाडे, नारायण शिरबिरे, बाळू वाकोडे, गणेश साबळे, तुकाराम वाघमारे, गजानन नरवाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Shabbaski's pat on the back of the meritorious