आंध्र-महाराष्ट्र सीमेवर सागवान ट्रक जप्त

By Admin | Updated: September 13, 2014 00:36 IST2014-09-13T00:36:17+5:302014-09-13T00:36:17+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी ....

Seven trucks seized on the Andhra-Maharashtra border | आंध्र-महाराष्ट्र सीमेवर सागवान ट्रक जप्त

आंध्र-महाराष्ट्र सीमेवर सागवान ट्रक जप्त

पिंपळखुटी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटी येथील वनउपज नाक्यावर निर्धारित परवान्यापेक्षा एक लाख ५० हजार किंमतीचा साडेचार घनमीटर सागवान कटसाईज माल ट्रकमध्ये भरून नागपूर येथून हैद्राबादाला जाणारा ट्रक क्रमांक ए़पी़०१-एक्स़१२५३ जप्त करण्यात आला़
पांढरकवडा सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीवअंतर्गत पिंपळखुटी येथे वनउपज नाका आहे़ गेल्या १ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर येथून हैद्राबादकडे जाणारा ट्रक क्रमांक ए़पी़०१-एक्स़१२५३ नाक्यावर एन्ट्री करण्यास आला होता़ तेथे ड्युटीवरील वनपाल ए़झेड़मिर्झा व वनपाल वानखेडे यांनी वाहतूक पास व ट्रकचे निरीक्षण केले़ त्यात वाहतूक पासवर १७ घनमीटर मालाचा उल्लेख आढळला़ प्रत्यक्षात ट्रकमध्ये भरलेला सागवान कटसाईज माल जास्तीचा असल्याचा संशय येताच, आऱएफ़ओ़ पवार यांच्याशी मिर्झा व वानखेडे यांनी भ्रम्हणध्वनीवरून संपर्क साधला़ पवार यांनी ट्रक थांबवून ठेवण्याचे आदेश दिले़ त्यानुसार ट्रक नाक्याच्या बाजूला लावण्यात आला़ परंतु वनविभागाचे कर्मचारी संंपावर असल्यामुळे ट्रक तेथेच पाच दिवस उभा होता़ त्यानंतर पाटणबोरी रेंज आॅफीस झरीजामणी येथे ट्रक नेण्यात आला़ तेथे ट्रकमधील सागवान कटसाईज मोजले असता, निर्धारीत परवान्यापेक्षा साडेचार घनमीटर सागवान जादा आढळून आले़ त्याची किंमत वनविभागाच्या अंदाजानुसार एक लाख ५० हजार रूपये आहे़ सदर सागवान माल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचे आऱएफ़ओ़ पवार यांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Seven trucks seized on the Andhra-Maharashtra border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.