सात लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: October 21, 2015 02:44 IST2015-10-21T02:44:29+5:302015-10-21T02:44:29+5:30

विदर्भातून मराठवाड्यात जाणारा तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा उमरखेड पोलिसांनी हरदडा फाट्यावर केलेल्या कारवाईत जप्त केला.

Seven lakhs gutkha seized | सात लाखांचा गुटखा जप्त

सात लाखांचा गुटखा जप्त

दोघांना अटक : उमरखेडची कारवाई, पुन्हा कारंजा ‘कनेक्शन’ उघड
उमरखेड : विदर्भातून मराठवाड्यात जाणारा तब्बल सात लाख रुपयांचा गुटखा उमरखेड पोलिसांनी हरदडा फाट्यावर केलेल्या कारवाईत जप्त केला. ही कारवाई मंगळवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून बोलेरो जीपही जप्त करण्यात आली आहे.
कारंजाचा गुटखाकिंग ‘जावेद’कडून मोठ्या प्रमाणात गुटखा मराठवाड्यात जात असल्याची गुप्त माहिती उमरखेड पोलिसांना मिळाली. त्यावरून मंगळवारी सकाळी ठाणेदार शिवाजी बचाटे यांनी आपल्या पथकासह सकाळी ६ वाजता हरदडा फाट्यावर सापळा रचला. साध्या वेशातील पोलीस उपनिरीक्षक मनोज मानकर, पोलीस शिपाई राजेश घोगरे, मोहन चाटे त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू होती. ही शोध मोहीम सुरू असताना बोलेरो पिकअप वाहन एम.एच.२९-टी-६२७९ हरदडा फाट्यावर थांबली. चालकाला हिमायतनगरचा रस्ता माहीत नसल्याने साध्या वेशातील पोलिसाला प्रवासी समजून त्याने हिमायतनगरचा रस्ता विचारला. पोलिसाने गाडीत काय आहे असे विचारले असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावरून पोलिसांना संशय आला. वाहनाची तपासणी सुरू केली असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचे पोते आढळून आले. २० पोत्यांमध्ये सात लाख रुपयांचा गुटखा ठेवून होता. या घटनेची माहिती उमरखेड ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग शिंदे घटनास्थळी पोहोचले. हरदडा फाट्यावरून गुटखा असलेले वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
आरोपी मोहंमद सोयब मोहंमद शबीर (२८) रा. बारभाई मोहोल्ला दारव्हा आणि मिर्झा अलीम बेग सरदार बेग (२४) रा. भुरेखा नगर दारव्हा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता सदर वाहन कारंजा येथील अब्दूल सकीर अब्दूल नजीर यांचे असल्याचे पुढे आले. सदर गुटखा मराठवाड्यातील हिमायतनगर येथील अमेर गोळी भांडारचे मालक शेख अमीर यांच्याकडे दारव्हा येथून जात असल्याची कबुली दिली. या गुटख्याची किंमत सात लाख आणि वाहनाची किंमत पाच लाख असा १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उमरखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे चांगलेल दणाणले आहे.
उमरखेड पोलिसांनी गेल्या वर्षभरात पाच वेळा गुटखा साठा जप्त केला. यातील आरोपींवर कारवाई केली. मंगळवारी पुन्हा सात लाखांचा गुटखा जप्त झाला. पोलीस गुटख्यांवर कारवाई करीत आहे. परंतु यवतमाळचा अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे हा विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गुटखा विक्रेते आणि या अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Seven lakhs gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.