यवतमाळच्या फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:11 IST2019-08-19T14:11:16+5:302019-08-19T14:11:39+5:30
हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला.

यवतमाळच्या फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पांढरकवडा रोड स्थित गुलशननगर येथील रहिवासी व फळांचे व्यापारी मोहंमद हाफीज मोहंमद साहब यांच्याकडे रविवारी रात्री सात लाखांची धाडसी घरफोडी झाली. त्यात पाच लाख ५७ हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
मोहंमद हाफीज यांचा आठवडी बाजार येथे फ्रुट मंडीमध्ये ठोक फळांचा व्यापार आहे. हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला. या धाडसी घरफोडीने अवधूतवाडी पोलिसांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांची चोरट्याचा माग काढण्यासाठी मदत घेतली जात आहे. चोरटे त्याच परिसरातील असावे असा संशयही पोलीस व्यक्त करीत आहे.