सात दुधारी कुऱ्हाडी जप्त, देशी कट्ट्याचा शोध सुरू
By Admin | Updated: August 29, 2015 02:36 IST2015-08-29T02:36:59+5:302015-08-29T02:36:59+5:30
मच्छीपूलनजीकच्या रोहिदासनगरातील एका पडक्या घरातून सात दुधारी कुऱ्हाडी शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ शहर पोलिसांनी जप्त केल्या.

सात दुधारी कुऱ्हाडी जप्त, देशी कट्ट्याचा शोध सुरू
यवतमाळ : मच्छीपूलनजीकच्या रोहिदासनगरातील एका पडक्या घरातून सात दुधारी कुऱ्हाडी शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ शहर पोलिसांनी जप्त केल्या. याच भागात देशी कट्टाही असल्याची पोलिसांची माहिती असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांना मो.इकबाल (३८) याच्यावर पोलिसांना संशय असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची मोर्चेबांधणी केली आहे.
एका निनावी फोनद्वारे या शस्त्रांची जमवाजमव सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संगीता हेलोंडे यांनी पथकासह शोधमोहीम सुरू केली. तेव्हा रोहिदासनगर परिसरातील एका पडक्या घराची पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा एका कोपऱ्यात सात दुधारी कुऱ्हाडी आढळून आल्या. या प्रकरणी संशयित इकबालच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे. उशिरापर्यंत या घटनेची नोंद घेण्यात आली नव्हती. दरम्यान, याच परिसरातील मंडप व्यावसायिक शेख रमजू शेख फकरु यांच्या तक्रारीवरून धमकाविल्याचा गुन्हा नोंदविला.