किन्ही गावात शिरलेल्या ट्रकने सात जनावरे चिरडली
By Admin | Updated: March 23, 2017 00:17 IST2017-03-23T00:17:58+5:302017-03-23T00:17:58+5:30
आर्णी मार्गावरील किन्ही येथे बुधवारी सकाळी भरधाव ट्रकने एका घराला धडक दिली. यात सात जनावरे ठार झाली.

किन्ही गावात शिरलेल्या ट्रकने सात जनावरे चिरडली
हिवरी : आर्णी मार्गावरील किन्ही येथे बुधवारी सकाळी भरधाव ट्रकने एका घराला धडक दिली. यात सात जनावरे ठार झाली.
ट्रक (जीजी १२/बीटी ९५११) ट्रेलरसह आर्णीमार्गे विजयापूर येथून नागपूरकडे जात होता. किन्हीनजिक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या मोहन दगडूसिंग राठोड यांच्या घराला धडकला. या धडकेत तेथे बांधून असलेल्या दोन म्हशी, तीन गायी आणि दोन बकरे चिरडून जागीच ठार झाले. तीन जनावरे जखमी झाली. मोहन राठोड यांच्या पत्नीसुद्धा या अपघातात जखमी झाल्या. राठोड यांच्या घराचे या अपघातात मोठे नुकसान झाले. सुधाकर मधुकर पवार यांच्याही घराला धडक बसली. यात त्यांच्या घराचेही नुकसान झाले. ट्रक चालक मोहम्मद शाकीरसुद्धा (रा. किसनगड, अजमेर) जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनव्दारे सदर ट्रक व ट्रेलर बाहेर काढण्यासाठी जवळपास दीड तास लागला. तोपर्यंत यवतमाळ ते आर्णी मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. (वार्ताहर)