अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता
By Admin | Updated: October 9, 2015 00:31 IST2015-10-09T00:31:13+5:302015-10-09T00:31:13+5:30
पुसद जिल्हा निर्मितीसाठी गांधी जयंतीपासून सुरू असलेल्या पुसद विकास मंचच्या अन्नत्याग आंदोलनाची गुरूवारी यशस्वी सांगता झाली.

अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता
पुसद जिल्हा निर्मिती : पुसद विकास मंचच्या पुढाकाराने आंदोलन
पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी गांधी जयंतीपासून सुरू असलेल्या पुसद विकास मंचच्या अन्नत्याग आंदोलनाची गुरूवारी यशस्वी सांगता झाली. या आंदोलनाला सर्वचस्तरातून उत्स्फुर्त पाठिंबा मिळाला.
गत दोन दशकांपासून पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न रेंगाळला आहे. जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात अॅड़ सचिन नाईक, निशांत बयास, अभय गडम, अभिलेख खैरमोडे, साकीब शाहा, किसन देशमुख, नाना बेले, बाळासाहेब बरडे, अॅड़ चंद्रशेखर शिंदे, पंकज पारधे, शरद मैंद, डॉ. वजाहत मिर्झा, भारत पेन्शनवार, ज्ञानेश्वर तडसे, पुंडलिक शिंदे, विष्णू वांजाळ, मनोहर बनसकर, महेंद्र मस्के, नारायण पुलाते सहभागी झाले होते. पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मिळत होता. माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रह मंडपाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. जिल्हा निर्मितीसाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्ष, पुसद तालुका पक्ष यासह पुसद तालुक्यातील २५ च्यावर ग्रामपंचायतींनी ठराव घेतले. जिल्हा काँग्रेस कमिटीने या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार तर तालुकाध्यक्ष पुंडलिक टारपे व ज्ञानेश्वर तडसे यांनी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा दिला.
सत्याग्रहाच्या यशस्वीतेसाठी निशांत बयास, अभय गडम, धनंजय सोनी, किरण देशमुख, अॅड़ चंद्रशेखर शिंदे, नारायण पुलाते, राहुल कांबळे, कैलास जगताप, धनंजय अत्रे, सुरेश डुबेवार, महेंद्र मस्के, रवी ग्यानचंदानी, अॅड़ कैलास राठोड, अॅड़ प्रशांत कागदेलवार यांनी सहकार्य केले. सुमारे २० हजार नागरिकांनी सत्याग्रहाला भेट दिल्याचे पुसद विकास मंचच्यावतीने सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)