बोरगडीवासीयांच्या उपोषणाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:27 IST2018-03-28T23:27:43+5:302018-03-28T23:27:43+5:30
तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी येथील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता झाली.

बोरगडीवासीयांच्या उपोषणाची सांगता
ऑनलाईन लोकमत
पुसद : तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहार प्रकरणी येथील पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा होऊन कारवाईचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
बोरगडी येथील ग्रामपंचायत सदस्य शरद ढेंबरे, गजानन शिंदे, कल्पना व्यवहारे, अब्दूल सलाम खान यांच्यासह बोरगडी येथील नारायण अंभोरे, पांडुरंग व्यवहारे, संजय पाईकराव, सुरेश विणकरे, सुभाष भालेराव, संतोष शेळके, देवानंद पुलाते, रवी ढगे, अशोक ढगे, रवी साखरे, संदीप ढोले यांनी १५ मार्चपासून साखळी उपोषणाला प्रारंभ केला होता. या उपोषणाची दखल घेत पंचायत समितीचे सभापती देवबा मस्के, उपसभापती गणेश पागिरे, जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, क्रांती कामारकर, गजानन उघडे, पंचायत समिती सदस्य भगवान भाकरे, देवेंद्र खडसे, किसन मळघणे, गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी भेट घेतली.
उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी तीन दिवसात करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसे आदेश विस्तार अधिकारी पी.डी. चव्हाण, ईश्वरसिंग बघेल, कनिष्ठ अभियंता सुनील वेळूकर यांना दिले. या प्रकरणी योग्य चौकशी होऊन कारवाई न झाल्यास यवतमाळ येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.