ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी
By Admin | Updated: September 25, 2016 02:56 IST2016-09-25T02:56:49+5:302016-09-25T02:56:49+5:30
कुणबी-मराठा समाज बहुसंख्येने असून तो विखुरलेला आहे. अशावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे,

ज्येष्ठांनी समाजाला दिशा दाखवावी
प्रतापराव रेचे : आर्णी येथे जिजाऊ समितीच्या शिष्यवृत्तीचे वाटप
आर्णी : कुणबी-मराठा समाज बहुसंख्येने असून तो विखुरलेला आहे. अशावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे मत भारती विद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक प्रतापराव रेचे यांनी केले.
येथील माहेर मंगल कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षण सहाय्यता समितीच्या शिष्यवृत्तीच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी रेचे बोलत होते. यावेळी नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष निताताई ठाकरे, माजी सभापती दिगांबर बुटले, पांडुरंग ब्रह्मकार, आखरे, अशोकराव देशमुख, विठ्ठल देशमुख, रमेश ठाकरे, सतीश देशमुख, पंचायत समितीच्या पहिल्या सभापती रजनीताई झापे, प्रतिभाताई बोके, खुशाल ठाकरे, समितीचे अध्यक्ष किशोर रावते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हरिश कुडे यांनी यवतमाळ येथे निघणाऱ्या मराठा-कुणबी मूक मोर्चात सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले. भोसले येथील गायत्री पांडुरंग चव्हाण या मुलीला पाच हजार रुपये रोख शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आले. जवळा येथील तलाठी यांचा मुलगा तसेच पुरुषोत्तम इंगोले यांच्या मुलाचा एमबीबीएसला नंबर लागल्याने, आशीर्वाद बुटले यांचा सत्कार करण्यात आला. समाजातील ज्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. राजेंद्र राऊत यांनी प्राप्त झालेल्या अर्जाचे विश्लेषण केले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष किशोर रावते, सूत्रसंचालन उपाध्यक्ष संदीप ढोले यांनी केले. आभार पुरुषोत्तम झापे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)