गावागावांत स्वयंघोषित लाईनमन

By Admin | Updated: February 7, 2015 23:32 IST2015-02-07T23:32:50+5:302015-02-07T23:32:50+5:30

तालुक्यात वीज वितरणचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून एकही लाईनमन गावाकडे फिरकताना दिसत नाही. परिणामी लहान-सहान दुरुस्तीसह इतर कामेही खासगी व्यक्तींकडूनच करून घ्यावी लागतात.

Self-Proposed Linean in the Village | गावागावांत स्वयंघोषित लाईनमन

गावागावांत स्वयंघोषित लाईनमन

महागाव : तालुक्यात वीज वितरणचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून एकही लाईनमन गावाकडे फिरकताना दिसत नाही. परिणामी लहान-सहान दुरुस्तीसह इतर कामेही खासगी व्यक्तींकडूनच करून घ्यावी लागतात. गावागावांत स्वयंघोषित लाईनमन तयार झाले असून यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून तसेच अनेक गावांमधीलडीपीही सताड उघड्या दिसतात.
महागाव तालुक्यात वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत अभियंते आणि लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. एकाएका लाईनमनकडे तालुक्यातील फिडरनिहाय गावे देण्यात आली आहे. परंतु लाईनमन कधी या गावात जाताना दिसतच नाही. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर गावकरी वीज वितरण कंपनीत तक्रार करतात. परंतु आठ-आठ दिवस कोणी येऊनही पाहात नाही. शेवटी गावातील खासगी लाईनमनकडून दुरुस्ती करून घ्यावी लागते. आता तर लहानसहान बिघाड झाल्यास गावकरी तक्रार द्यायलाही जात नाही. सरळ खासगी लाईनमनला शोधून त्याच्याकडून दुरुस्ती करून घेतली जाते. फ्यूज टाकण्यापासून ते खांबावर चढून तार जोडण्यापर्यंत कामे खासगी लाईनमन करताना दिसून येतात. अशा लाईनमनची गावांमध्ये चलती असून अल्प मोबदल्यात वाटेल ते काम धोका पत्करून करीत आहे.
अनेकदा लाईनमन गावात दुरुस्तीसाठी आला तरी त्यांना खांबावर चढणेच जमत नाही. त्यामुळे गावातील खासगी व्यक्तीच खांबावर चढून दुरुस्तीचे काम करतो. कोणतेही तांत्रिक ज्ञान नसलेले व्यक्ती स्वयंघोषित लाईनमन झाल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता असते. परंतु थोड्या पैशासाठी ही मंडळी जीवावर उधार होवून दुरुस्तीची कामे करतात. हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांपासून अभियंत्यांपर्यंत सर्वांनाच माहीत आहे. परंतु कारवाई करणार तरी कशी? कारण एकही कर्मचारी गावात पोहोचतच नाही. परस्परच दुरुस्ती होत आहे ना! यावरच समाधान मानून शहराच्या ठिकाणी ही मंडळी बिनधास्त वावरताना दिसते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Self-Proposed Linean in the Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.