वनरक्षकाचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
By Admin | Updated: March 13, 2015 02:18 IST2015-03-13T02:18:56+5:302015-03-13T02:18:56+5:30
टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत वनरक्षकाने बदली होवूनही कार्यमुक्त न केल्याने शुक्रवारी १३ मार्च रोजी येथील वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक ...

वनरक्षकाचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत वनरक्षकाने बदली होवूनही कार्यमुक्त न केल्याने शुक्रवारी १३ मार्च रोजी येथील वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ई-मेलने दिलेल्या या धमकीमुळे वन खात्यात खळबळ निर्माण झाली आहे.
संजय सुदाम ठाकरे असे वनरक्षकाचे नाव आहे. हा वनरक्षक टिपेश्वर अभयारण्यात कार्यरत होता. त्याची उमरखेड येथील पैनगंगा अभयारण्यात दराटी येथे आपसी तडजोडीने बदली झाली. मात्र वन्यजीव विभागाच्या पांढरकवडा कार्यालयाने त्याला कार्यमुक्तच केले नाही. वारंवार विनवन्या करूनही वन प्रशासन दखल घेत नसल्याचे पाहून अखेर वनरक्षक ठाकरे यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला. त्यांनी वन प्रशासनाला ई-मेल पाठविला. त्यात कार्यमुक्त केले जात नसल्याने आपण १३ मार्च रोजी पांढरकवडा उपवनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह आत्मदहन करू, असे नमूद केले. दरम्यान, सदर वनरक्षक तीन महिन्यांपासून ड्युटीवरच नसल्याचा बचाव वन प्रशासनाने घेतला आहे. आत्मदहन आंदोलन होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहे. सदर कर्मचाऱ्याची शोधाशोध सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)