विषय समितीच्या सभापतींची निवड

By Admin | Updated: December 6, 2015 02:31 IST2015-12-06T02:31:27+5:302015-12-06T02:31:27+5:30

नगरपंचायतच्या विषय समित्यांची निवड शनिवारी करण्यात आली. सर्वच सभापतिपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्व सभापती अविरोध निवडले गेले.

Selection of the subject committee's chairmanship | विषय समितीच्या सभापतींची निवड

विषय समितीच्या सभापतींची निवड

कळंब : नगरपंचायतच्या विषय समित्यांची निवड शनिवारी करण्यात आली. सर्वच सभापतिपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने सर्व सभापती अविरोध निवडले गेले.
उपाध्यक्ष असलेले मनोज काळे यांच्याकडे पाणीपुरवठा खाते देण्यात आले. शिवसेनेच्या सुनीता डेगमवार आरोग्य तर जयश्री गावंडे या महिला व बालकल्याण सभापती झाल्या. भाजपाचे आशिष धोबे यांच्याकडे बांधकाम सभापतिपद देण्यात आले. अपक्ष नगरसेवक शैलजा उमरतकर यांनी सेना-भाजपाचे नगराध्यक्ष व उपाध्यक्षाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांना महिला व बालकल्याणचे उपसभापतिपद देण्यात आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष दिगांबर मस्के राहणार आहे.
या समितीमध्ये मनोज काळे, आशिष धोबे, सुनीता डेगमवार व जयश्री गावंडे या सभापतीचा समावेश करण्यात आला. या विषय समित्या एक वर्षासाठी कायम राहणार आहे. समिती सदस्यांमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांनाही स्थान देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

राळेगावात बांधकाम समिती कवीश्वर यांच्याकडे

राळेगाव : राळेगाव नगरपंचायतीसाठी शनिवारी विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली. चारही सभापती अविरोध निवडले गेले. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सर्वच ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष याप्रमाणे विषय समितीचे सभापतीही भाजपचे झाले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बबनराव भोंगारे यांची निवड झाली. नियोजन व पाणीपुरवठा समिती उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांच्याकडे आहे. बांधकाम समिती सभापतीपदी भालचंद्र कवीश्वर यांची निवड झाली आहे. महिला व बाल कल्याण सभापतीपद माला प्रफुल्ल खसाळे यांच्याकडे, तर आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपदी अरुण शिवणकर यांची निवड झाली आहे. नियोजन समिती सदस्यामध्ये मीना गायधने, वनिता दुर्गे, बांधकाम - छाया पिंपरे, किशोर जुनुनकर, महिला - बबीता आमटे, शोभा गजबे, आरोग्य समिती सदस्यांमध्ये सुषमा शेलोटे, सविता पोटदुखे यांचा समावेश आहे. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या मार्गदर्शनात या समित्या गठित झाल्या. पिठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते होते. त्यांना तहसीलदार सुरेश कव्हळे, मुख्याधिकारी दिवाकर जुगनाके यांचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Selection of the subject committee's chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.