कळंब तालुक्यात ३० सरपंचांची निवड

By Admin | Updated: May 8, 2015 00:10 IST2015-05-08T00:10:17+5:302015-05-08T00:10:17+5:30

तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडीची गुरुवारी घोषणा करण्यात आली.

Selection of 30 Sarpanchs in Kalamb Taluka | कळंब तालुक्यात ३० सरपंचांची निवड

कळंब तालुक्यात ३० सरपंचांची निवड

कळंब : तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडीची गुरुवारी घोषणा करण्यात आली. हिवरादरणे येथे निवड प्रकियेदरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर मावळणी येथील निवड प्रक्रिया कोरमअभावी तहकूब करण्यात आली. बहुतांश ठिकाणच्या निवडी अविरोध झाल्या.
परसोडी (बु.) येथील ग्रामपंचायतची निवडणूक अतिशय लक्षणीय होती. येथील सरपंचपदी आनंदराव जगताप तर उपसरपंचपदी सुभाष गोडे यांची अविरोध निवड झाली. सोनेगाव येथे सरपंचपदी रमेश कृष्णराव पाटील तर उपसरपंचपदी साधना विनोद देठे, चिंचोली येथे सरपंचपदी रंजना संजय डबले तर उपसरपंचपदी सुवर्णा चंद्रकांत आगलावे, सावरगाव येथे सरपंचपदी इंदुबाई विनोद कोरले तर उपसरपंचपदी प्रशांत काशिनाथ वाघमारे, दत्तापूर येथे सरपंचपदी सीमा विनायक खैरकार तर उपसरपंचपदी भास्कर देवराव साठे, बोरीमहल येथे सरपंचपदी स्वप्नील रमेश भानखेडे तर उपसरपंचपदी सुरज चिंधुजी मेश्राम, पाथ्रड येथे सरपंचपदी विशाल शालीक वाघ तर उपसरपंचपदी सविता अरुण कन्नाके, पिंपळगाव(रुईकर) येथे सरपंचपदी सुनिता विजय खडसे तर उपसरपंचपदी खुशाल विठोबा पाटील, उमरी येथे सरपंचपदी जनार्दन गुणवंत रोकडे तर उपसरपंचपदी विजय पंडीत रोकडे, दोनोडा येथे सरपंचपदी उषा विनोद पेंदाम तर उपसरपंचपदी प्रदीप गुणवंत कदम, पार्डी(सावळापूर) येथे सरपंचपदी अर्चना अमरदीप भोयर तर उपसरपंचपदी नितीन मारोतराव दरणे, कोठा येथे सरपंचपदी सिंधू सुभाष कदम तर उपसरपंचपदी संदीप खुशाल गजबे, हिवरादरणे येथे सरपंचपदी कलावती सुरेश चाडगे तर उपसरपंचपदी दत्तकुमार वासुदेव दरणे, सातेफळ येथे सरपंचपदी अनिल रामदास पाटील तर उपसरपंचपदी देवका मारोती उईके, म्हसोला येथे सरपंचपदी प्रशांत गुलाब बकाल तर उपसरपंचपदी नलु मारोतराव नागोसे, धोत्रा येथे सरपंचपदी सुधाकर शंकर सांळुके तर उपसरपंचपदी सतिश विठोबा नेहारे, मलकापूर येथे सरपंचपदी प्रमिला भास्कर दरणे तर उपसरपंचपदी रमेश माणीक लभाने, निभोंरा येथे सरपंचपदी निळकंठ रामाजी कुळसंगे तर उपसरपंचपदी पदी गजानन बाळकृष्ण मुके, तिरझडा येथे सरपंचपदी माणका राजेंद्र शेंडे तर उपसरपंचपदी कमल सुहास गोंदे, गंगापूर येथे सरपंचपदी शुभांगी गजानन मेश्राम तर उपसरपंचपदी अमोल संतोष गणेशपूरे यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये शांततापूर्वक निवड प्रक्रिया पार पडली. (तालुका प्रतिनिधी)

घाटंजी तालुक्यात महिलांचे वर्चस्व
घाटंजी : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यामध्ये दहा ठिकाणी महिला सरपंच तर सहा ठिकाणी महिला उपसरपंच म्हणून निवडून आल्या. त्यामुळे या निवडीवर महिलांचे वर्चस्व तालुक्यात दिसून आले. बेलोरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दुर्गा चौधरी व उपसरपंचपदी अनिल बिरकड यांची निवड झाली. शिरोली ग्रामपंचायत सरपंचपदी ज्योती कांबळे तर उपसरपंचपदी आशीष लोणकर, मारेगाव सरपंचपदी अरुण अरबट तर उपसरपंचपदी संतोष कारेवार, पिंपरी सरपंचपदी गुणवंत नाकले व उपसरपंचपदी हरिभाऊ कोहचाडे, इंझाळा सरपंचपदी अनिल आत्राम तर उपसरपंचपदी विजय ठाकरे, एरणगाव सरपंचपदी शेखर बुरघाटे तर उपसरपंचपदी पुंडलिक लामतुरे, आमडी सरपंचपदी अभिषेक ठाकरे तर उपसरपंचपदी राजेश घरत, पंगडी सरपंचपदी गजानन काकडे तर उपसरपंचपदी विद्या चौधरी, सावरगाव(मंगी) सरपंचपदी ज्योत्स्ना पेंदोर तर उपसरपंचपदी किरण प्रधान, राजापेठ सरपंचपद रिक्त असून उपसरपंचपदी रमेश आंबेपवार, सायफळ सरपंचपदी दत्ता परचाके तर उपसरपंचपदी निर्मला दासरवार, अंजी(नृसिंह) सरपंचपदी ताई कनाके तर उपसरपंचपदी नितीन भोयर, वघार(टाकळी) सरपंचपदी सपना मॅकलवार तर उपसरपंचपदी माला राऊत, डोर्ली सरपंचपदी विशाल सुरपाम तर उपसरपंचपदी अतिश महल्ले, खापरी सरपंचपदी शंकर काकडे तर उपसरपंचपदी मोहन जगताप, दहेगाव सरपंचपदी पांडुरंग सिदुरकर तर उपसरपंचपदी वसंत धानोरकर, सावंगी(संगम) सरपंचपदी अजय यट्टीवार तर उपसरपंचपदी सुवर्णा श्रीपदवार, कुर्ली सरपंचपदी रूबिना परवीन सोलंकी तर उपसरपंचपदी राजेंद्र कोडे, वाढोणा(खु) सरपंचपदी जनाबाई उईके तर उपसरपंचपदी उत्तम शेंडे, मुर्ली सरपंचपदी यशवंत चौधरी तर उपसरपंचपदी अमोल बेले, झटाळा सरपंचपदी बेबी मेश्राम तर उपसरपंचपदी कमरखाँ पठाण, चिखलवर्धा सरपंचपदी मंगला कनाके तर उपसरपंचपदी जैतुजी मेश्राम, कुंभारी सरपंचपदी प्रीती भोयर तर उपसरपंचपदी रूपराव डुबे यांची निवड झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Selection of 30 Sarpanchs in Kalamb Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.