‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड
By Admin | Updated: March 2, 2016 02:54 IST2016-03-02T02:54:31+5:302016-03-02T02:54:31+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी अश्विन उके

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी अश्विन उके याची आर.एस.जे. इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. या नामांकित टेक्सटाईल कंपनीत निवड झाली. महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूतून दिल्ली परिक्षेत्रासाठी त्याची निवड करण्यात आली. सदर कंपनी टेक्सटाईल जगतातील आंतरराष्ट्रीयस्तरावर विविध कंपन्यांचे गुणवत्ता परीक्षण तसेच त्यांना प्रमाणित करण्याचे काम करते. आठहून अधिक देशात या कंपनीचे कार्यक्षेत्र आहे. भारतात सहा ठिकाणाहून त्यांचे कामकाज चालते. या कंपनीने जेडीआयईटीतील टेक्सटाईल विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला. कंपनीचे मॅनेजर वीरेंद्र इंगळे, सिनिअर सर्टिफायर प्रसन्न मयांदी यांनी मुलाखती घेतल्या. यातून अश्विन उके याची निवड झाली. त्याला दोन लाख रुपये पॅकेज घोषित करण्यात आले आहे. (वार्ताहर)