‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड
By Admin | Updated: June 24, 2015 00:12 IST2015-06-24T00:12:06+5:302015-06-24T00:12:06+5:30
स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी दर्शन गुरनुले याची पुणे येथील रेनफ्रो प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड
यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी दर्शन गुरनुले याची पुणे येथील रेनफ्रो प्रा.लि. या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.
कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात झालेल्या आॅफ कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग शाखेतील अंतिम वर्षाचे निवडक विद्यार्थी सहभागी झाले होते. टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्यांमधून दर्शन गुरनुले याची निवड करण्यात आली. त्याला कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात ट्रेनी इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्याला एक लाख ९० हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित केले आहे. (वार्ताहर)