‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:39 IST2017-10-16T23:39:22+5:302017-10-16T23:39:59+5:30

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी शुभम बोकिलवार याची पुणे येथील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीत निवड झाली आहे.

Selected in the JDIET's student nominated company | ‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्याची नामांकित कंपनीत निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी शुभम बोकिलवार याची पुणे येथील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीत निवड झाली आहे. कंपनीच्या चाकन येथील कार्यालयात झालेल्या इंटरव्ह्यूतून त्याची निवड झाली आहे. टेक्नीकल इंटरव्ह्यू व एचआर इंटरव्ह्यूच्या फेºयांमध्ये यशस्वी झाल्यानंतर शुभम बोकिलवार याची निवड करण्यात आली. त्याला कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात आर अँड डी इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selected in the JDIET's student nominated company