शिरसगाव पांढरीच्या नराधमाला सक्त मजुरी
By Admin | Updated: November 11, 2016 02:05 IST2016-11-11T02:05:32+5:302016-11-11T02:05:32+5:30
तालुक्यातील शिरसगाव (पांढरी) येथे एका पाच वर्षिय बालिकेला बिस्किटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार

शिरसगाव पांढरीच्या नराधमाला सक्त मजुरी
नेर : तालुक्यातील शिरसगाव (पांढरी) येथे एका पाच वर्षिय बालिकेला बिस्किटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी दहा वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपयांच दंड ठोठावला.
नेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिरसगाव (पांढरी) येथे २९ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी श्रावण बाबाराव अंबुरे याने गावातीलच एका बालिकेला बिस्किटाचे आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सदर बाब पिडित बालिकेच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी नेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालिन ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सदर प्रकरण न्यायालयात प्रविष्ट झाल्यानंतर यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता बालिका व तिच्या आईचा पुरावा महत्वाचा ठरला. जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वानखडे यांनी आरोपी श्रावण अंबुरे याला दहा वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील निती दवे यांनी बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)