नेरमध्ये नबाबपूर, आनंदवाडी परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:22+5:30
नेर शहरात सुरुवातीला वलीसाहब नगर येथील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच परिवारातील दोघे जण पॉझिटिव्ह आले होते. ते सर्वच कोरोनामुक्त झाले आहे. मात्र आता आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. हार्डवेअर चालकाचा दिवाणजी बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो दिवाणजी मालकाच्या घरीच भाड्याने राहात होता.

नेरमध्ये नबाबपूर, आनंदवाडी परिसर सील
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शहरातील एका दुकानाचा नोकर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर आनंदवाडी परिसरातील महिलाही पॉझिटिव्ह आली. २४ तासात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील ११ जणांना कोविड केंद्रात हलविले आहे. एक दुकानदार, डॉक्टर व तीन नोकर हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहे. नबाबपूर व आनंदवाडी परिसर सील केला आहे.
नेर शहरात सुरुवातीला वलीसाहब नगर येथील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच परिवारातील दोघे जण पॉझिटिव्ह आले होते. ते सर्वच कोरोनामुक्त झाले आहे. मात्र आता आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. हार्डवेअर चालकाचा दिवाणजी बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो दिवाणजी मालकाच्या घरीच भाड्याने राहात होता. आजारी पडल्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे तपासणीकरिता गेला. डॉक्टरला कोरोनाची शंका आल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात तपासणीला जाण्याचा सल्ला दिला. तेथे तो पॉझिटिव्ह आढळला आहे. हा अहवाल येताच तहसीलदार अमोल पोवार, नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव, ठाणेदार प्रशांत मसराम, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित चव्हाण, डॉ. प्रतीक खोडवे, अशोक राऊत, नानासाहेब घोंगळे, शंकर भागळकर आदींनी निर्देश देवून परिसर सील केला व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.