वणीत १५ जणांच्या हातावर शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:07+5:30

आरोग्य विभागाचा ‘वॉच’ आहे. सोमवारपर्यंत वणीत परतलेले २४८ लोक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून त्यांपैकी परदेशातून वणीत परतलेल्या १५ जणांच्या हातांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहेत. यात परदेशातून परत आलेल्यांचाही समावेश आहे. यांपैकी कुणाला कोरोनाची बाधा झाली तर नाही ना, याची चाचपणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.

Seal on the hands of 15 people in the weave | वणीत १५ जणांच्या हातावर शिक्का

वणीत १५ जणांच्या हातावर शिक्का

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंध : ‘होम क्वॉरंटाईन’ केलेल्यांची संख्या २४८ वर पोहचली

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : जगभर वेगाने फैलत असलेल्या कोरोना आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाचे युद्ध सुरू आहे. पुणे, मुंबईसह देश व परदेशात विविध कारणांनी गेलेले लोकांचे लोंढे वणीत परतत आहेत. अशांवर आरोग्य विभागाचा ‘वॉच’ आहे. सोमवारपर्यंत वणीत परतलेले २४८ लोक आरोग्य विभागाच्या निगराणीखाली असून त्यांपैकी परदेशातून वणीत परतलेल्या १५ जणांच्या हातांवर ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारण्यात आला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत आहेत. यात परदेशातून परत आलेल्यांचाही समावेश आहे. यांपैकी कुणाला कोरोनाची बाधा झाली तर नाही ना, याची चाचपणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे.
सुदैवाने वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात अद्यापही कुणी संशयित रुग्ण आढळला नाही. असे असले तरी जे लोक राज्यातील कोरोनाबाधित क्षेत्रातून वा परदेशातून स्वगृही परतले आहेत, अशांची तपासणी करून त्यांना ‘होम क्वारंटाइन’ करत घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण घराबाहेर न पडण्याची खबरदारी घेत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे यांनी सांगितले. होम क्वारंटाइनचा कालावधी आता, १४ दिवसांवरून २१ दिवस करण्यात आला आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयात रविवारपर्यंत ११८ लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्याने त्यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आल्याचे वणी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कमलाकर पोहे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. या सर्वांवर आरोग्य विभागाचा ‘वॉच’ असल्याचे ते म्हणाले.


ग्रामीण रुग्णालयावरील ताण वाढला
कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर काम वाढत आहे. ग्रामीण रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने सध्यस्थितीत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. हे कर्मचारी प्रचंड तणावात काम करीत असल्याचे चित्र सोमवारी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पहायला मिळाले. वरिष्ठांनी रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Seal on the hands of 15 people in the weave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.