बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वादावर पडदा
By Admin | Updated: February 22, 2015 02:02 IST2015-02-22T02:02:36+5:302015-02-22T02:02:36+5:30
बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणात न्यायालाच्या निकालामुळे वाद मिटला आहे.

बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या वादावर पडदा
यवतमाळ : बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणात न्यायालाच्या निकालामुळे वाद मिटला आहे. मिराताई आंबेडकर यांचा अध्यक्षपदावरील दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यात विश्वस्तांचा विजय झाला आहे, अशी माहिती शनिवारी येथे पत्र परिषदेत चंद्रबोधी पाटील यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर भय्यासाहेब आंबेडकर यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्यानंतर मिराताई आंबेडकर यांनी स्वत:ला अध्यक्ष घोषित केले.
याबाबत सोसायटीतील सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. आयुक्तांनी मिराताई आंबेडकर यांची नियुक्ती रद्द ठरविली.
यानंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा या खटल्याचा प्रवास चालला, अशी माहिती चंद्रबोधी पाटील यांनी पत्र परिषदेतून दिली. या पात्ररिषदेला भूपेश थुलकर, भीमराव कांबळे, अनिल कुमार मेश्राम, मनोहर दुपारे, सुखदेवराव जाधव, जयकृष्ण बोरकर, धर्मपाल माने, गोविंद मेश्राम, चंद्रकांत अलोणे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)