केळझरा येथील शाळेचा अभिनव उपक्रम
By Admin | Updated: July 2, 2015 02:52 IST2015-07-02T02:52:35+5:302015-07-02T02:52:35+5:30
तालुक्यातील केळझरा (वरठी) जिल्हा परिषद शाळेने नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी ...

केळझरा येथील शाळेचा अभिनव उपक्रम
आर्णी : प्राण्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी ठरले आकर्षण
आर्णी : तालुक्यातील केळझरा (वरठी) जिल्हा परिषद शाळेने नवीन प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी मंगळवारी प्राण्यांची वेशभूषा करून गावातून प्रभातफेरी काढली. या उपक्रमातून नागरिकांचे व बालकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी वाघाच्या वेशभषेत सुजल मुधळे, घोड्याच्या वेशभषेत प्रथमेश धोंगडे या विद्यार्थ्यांनी सुंदर अभिनय केला. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी किशोर रावते, विस्तार अधिकारी जाधव, इंद्रपाल आडे, केंद्रप्रमुख राजू परमार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन पिसे, संतोष भगत, सुधाकर लिंगायत, डॉ. दीपक स्थूल, अशोक धोंगडे, रुपेश खरतडे, गुलाब गजघाटे, एकनाथ पेटकुले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)