शाळा, महाविद्यालये तुरुंग घोषित
By Admin | Updated: December 13, 2015 02:39 IST2015-12-13T02:39:11+5:302015-12-13T02:39:11+5:30
शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात १९८६ मध्ये कापसाला दरवाढीसाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वात सेवाग्राम येथे आंदोलन करण्यात आले.

शाळा, महाविद्यालये तुरुंग घोषित
शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात १९८६ मध्ये कापसाला दरवाढीसाठी शरद जोशी यांच्या नेतृत्वात सेवाग्राम येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लाखो शेतकरी सहभागी झाले होते. सर्व आंदोलकांना शासनाने अटक केली होती. पण कारागृह अपुरे पडले. त्यावेळी शाळा, महाविद्यालये, धर्मशाळांना तुरुंग घोषित करत, त्यात या आंदोलकांना डांबले होते. हा घटनाक्रम शेतकरी संघटनेचे कळंब येथील ज्येष्ठ सहकारी देवीदास काळे यांनी सांगितला. याशिवाय शरद जोशी यांनी यवतमाळ जिल्ह्यात केलेल्या ठिकठिकाणच्या आंदोलनाविषयीसुद्धा देवीदास काळे यांनी माहिती देताना आंदोलनाची व्याप्ती सांगितली.