शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

२२ हजार गुणवंत विद्यार्थ्यांच्या ‘मेरीट’ला शाळांचाच अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 15:38 IST

शिष्यवृत्ती मिळाली, रक्कम मिळेना : बॅंक खाते लिहिण्यात कुचराई

अविनाश साबापुरे

यवतमाळ : वर्षभर प्रचंड मेहनत घेऊन हजारो कोवळी मुले शिष्यवृत्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. मेरीट लिस्टमध्येही आली. परंतु या गुणवंतांची त्यांच्याच शाळांना अजिबात कदर नसल्याने त्यांचा बॅंक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे राज्यातील २२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे.

पूर्वउच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवी आणि पूर्वमाध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. २०२२ च्या जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडली. तर यंदा ३ जानेवारीला निकाल जाहीर झाला. त्यात पाचव्या वर्गातील १६ हजार २३२ आणि आठव्या वर्गातील १२ हजार ९३९ असे २९ हजार १७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. आता त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी दरवर्षीप्रमाणेच त्यांचे बॅंक खाते क्रमांक परीक्षा परिषदेला कळविणे आवश्यक आहे.

मात्र, परीक्षा परिषदेकडून वारंवार सूचना दिल्यानंतरही संबंधित विद्यार्थ्यांच्या शाळांनी, तेथील मुख्याध्यापकांनी या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. तब्बल महिना उलटून गेल्यानंतर २९ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ सात हजार विद्यार्थ्यांचे खाते परिषदेला कळविण्यात आले. तर २२ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यांचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. त्यामुळे परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी सर्व जिल्हा यंत्रणांना निर्वाणीचे पत्र पाठविले आहे.

इयत्ता पाचवीचे वंचित विद्यार्थी

रायगड २७९, ठाणे ५०२, पालघर २३८, पुणे ८४२, अहमदनगर ५८८, सोलापूर ५३७, नाशिक ५९७, धुळे २२१, जळगाव ४४५, नंदूरबार १८३, कोल्हापूर ४३८, सातारा ३५८, सांगली ३५३, रत्नागिरी १७४, सिंधुदुर्ग ९३, औरंगाबाद ४०३, जालना २१४, बीड ३३९, परभणी १८९, हिंगोली १३९, अमरावती ४६०, बुलडाणा ३३७, अकोला २७०, वाशिम १९१, यवतमाळ ३७७, नागपूर ६९६, भंडारा १७५, गोंदिया १९२, वर्धा १६१, चंद्रपूर ३१९, गडचिरोली १३०, लातूर ३३५, उस्मानाबाद २१८, नांदेड ३९०, मुंबई १२५० एकूण १२,६३३.

इयत्ता आठवीचे वंचित विद्यार्थी

रायगड २४८, ठाणे ३६१, पालघर १२९, पुणे ७३६, अहमदनगर ४५२, सोलापूर ४८०, नाशिक ५८७, धुळे २२८, जळगाव २९२, नंदुरबार १६१, कोल्हापूर ३७३, सातारा ३५१, सांगली ३०८, रत्नागिरी १८४, सिंधुदुर्ग १०५, औरंगाबाद ३७५, जालना १७०, बीड २८६, परभणी १३७, हिंगोली १००, अमरावती १८५, बुलडाणा २७१, अकोला १८७, वाशिम १२१, यवतमाळ १९५, नागपूर २८२, भंडारा १३४, गोंदिया १५४, वर्धा ६१, चंद्रपूर ११३, गडचिरोली ११, लातूर ३११, उस्मानाबाद १९३, नांदेड ३१९, मुंबई ९१५ एकूण ९५१५.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाYavatmalयवतमाळ