शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शालेय विद्यार्थ्यांना दिलासा; गणवेश निधीवर अखेर शिक्षण विभाग नमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:25 IST

विद्यार्थी आणि त्याच्या आईचे संयुक्त खाते असेल तरच गणवेशाचे पैसे दिले जाईल, असा कठोर नियम करणाऱ्या शिक्षण विभागाने अखेर अधिवेशनाच्या धसक्याने नरमाईची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देपालकांचेही खाते चालणारअधिवेशनाच्या धसक्याने शिस्तीला मुरड

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विद्यार्थी आणि त्याच्या आईचे संयुक्त खाते असेल तरच गणवेशाचे पैसे दिले जाईल, असा कठोर नियम करणाऱ्या शिक्षण विभागाने अखेर अधिवेशनाच्या धसक्याने नरमाईची भूमिका घेतली आहे. संयुक्त खात्याचा आग्रह न धरता विद्यार्थी, आई, वडील किंवा पालकाचे स्वतंत्र खाते असले तरी अनुदानाची रक्कम देण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.शैक्षणिक सत्र अर्धेअधिक संपले तरी राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळालेला नाही. सर्व शिक्षा अभियानातून यंदा मोफत गणवेशाऐवजी प्रति गणवेश २०० रुपये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात देण्याचा (डीबीटी) निर्णय झाला. परंतु, नंतर हा निर्णय अधिक कठोर करीत विद्यार्थी व आईच्या संयुक्त आधार संलग्न खात्यातच पैसे टाकण्याचे बंधन घालण्यात आले. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अडचणीचा ठरला. ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आईचे संयुक्त खातेच नाही.जिल्हास्तरावर गणवेश अनुदानाचे पैसे आलेले असतानाही ते विद्यार्थ्यांच्या खात्यात जाऊ शकलेले नाही. या विषयावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठण्याची शक्यता लक्षात घेता, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक तथा राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी नमती भूमिका घेतली. संयुक्त बँक खात्याचा आग्रह न धरता विद्यार्थ्याचे एकट्याचे, आईचे, वडिलांचे किंवा पालकाचे स्वतंत्र खाते असले तरी गणवेशाचे पैसे अदा करण्याचे आदेश नंदकुमार यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.अंमलबजावणी चुकलीगणवेशाबाबत डीबीटीचा निर्णय झाल्यावर या पैशाचा ग्रामीण भागातील पालक दुरुपयोग करतील, असा आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी व आईच्या संयुक्त खात्यात पैसे टाकण्याचे बंधन घालण्यात आले होते. पण सात महिने उलटून गेल्यावरही कोणत्याही जिल्ह्यात शंभर टक्के विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून देण्यात शिक्षण विभागाला यश आले नाही. अनेक विद्यार्थ्यांना बँकांच्या ‘मिनिमम बॅलेन्स’चा फटका बसला.

टॅग्स :educationशैक्षणिक