गावागावांत शाळांच्या जाहिरातीचे फलक

By Admin | Updated: June 24, 2016 02:48 IST2016-06-24T02:48:04+5:302016-06-24T02:48:04+5:30

जिल्हा परिषद शाळांनी येणाऱ्या सत्राची जोरदार तयारी सुरु केली असून शाळांची जाहिरात व प्रवेशोत्सावाने नव्या सत्राचा प्रत्येक शाळेत प्रारंभ होणार आहे.

School advertisement board in the village | गावागावांत शाळांच्या जाहिरातीचे फलक

गावागावांत शाळांच्या जाहिरातीचे फलक

शाळेची पहिली घंटा : जिल्ह्यात प्रवेशोत्सव सुरू, नवागतांच्या प्रवेशाचीही जोरदार तयारी
हरसूल : जिल्हा परिषद शाळांनी येणाऱ्या सत्राची जोरदार तयारी सुरु केली असून शाळांची जाहिरात व प्रवेशोत्सावाने नव्या सत्राचा प्रत्येक शाळेत प्रारंभ होणार आहे. शाळापूर्वतयारी करीता शिक्षकांनी कंबर कसली असून यंदाचा प्रवेशोत्सव ‘हिट’ होणार असल्याची बोलकी प्रतिक्रीया शिक्षक व्यक्त करीत आहे.
अनेक मोफत योजना जिल्हा परिषद शाळांमधून राबविण्यात येत असल्या तरी या शाळांमध्ये आपली मुले शिकविण्यास पालक फारसे उत्साही दिसत नाही. पालकांचा ओढा शहरी व इंग्रजी शाळांकडेच आहे. पाठ्यपुस्तके, गणवेश, लेखन साहित्य, पोषण आहार अशा अनेक सुविधा व शिष्यवृत्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना पुरविल्या जातात. या योजनांची माहिती पालकांना व गावकऱ्यांना व्हावी तसेच शाळेत राबविल्या जाणारे विद्यार्थी विकासाचे उपक्रम शाळांपुरते मर्यादित न ठेवता ते सार्वजनिक करावे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आप आपली जाहिरात या शैक्षणिक सत्रात करणार आहेत. शाळा सुरु होण्यापूर्वीच प्रत्येक शाळेने आपली स्वतंत्र जाहिरात तयार करून गावात दर्शनी भागावर लावण्यास शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जाहिरातीचा फ्लेक्स तयार करून बसस्थानक, गावातील प्रमुख रस्ते व दर्शनी भागावर शिक्षक लावत आहेत. काही शाळा याही पुढे जावून शाळेची जाहिरात आटोरिक्षा आणि वाहनांवर करीत आहे. शाळांच्या जाहिरातीची स्पर्धाच जिल्हा प्रशासनाने आयोजित केल्यामुळे शिक्षक आपली कल्पकता वापरून जाहिराती बनवीत आहेत.
विदभार्तील शाळांचा पहिला ठोका येत्या २७ जूनला पडणार आहे. पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या नवागत मुलांचे जोरदार स्वागत करण्याचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाला पूरक अशी प्रवेशोत्सव स्पर्धा ही जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नव्याने शाळेत प्रवेशित मुलांच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन शिक्षकांना करावयाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळेत मुलांचे प्रवेश ही उत्साहपूर्ण होणार असून शिक्षक अनेक योजना यासाठी आखत आहेत. (वार्ताहर)

Web Title: School advertisement board in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.