विद्यार्थ्यांना २९ कोटी ८३ लाखांची शिष्यवृत्ती
By Admin | Updated: April 25, 2015 02:02 IST2015-04-25T02:02:13+5:302015-04-25T02:02:13+5:30
केंद्र शासनाच्यावतीने शंभर टक्के पुरस्कृत असलेली भारत सरकार दहावीनंतरची शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची ठरली आहे.

विद्यार्थ्यांना २९ कोटी ८३ लाखांची शिष्यवृत्ती
यवतमाळ : केंद्र शासनाच्यावतीने शंभर टक्के पुरस्कृत असलेली भारत सरकार दहावीनंतरची शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाची ठरली आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. गेल्या आर्थींक वर्षात तब्बल २८ हजार ७६४ विद्यार्थ्यांना २९ कोटी ८३ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवगार्तील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. यासाठी पालकांचे वार्षीक उत्पन्न अनुसूचित जाती करीता दोन लाख तर अन्य प्रवगार्तील विद्यार्थ्यांकरीता एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे एका कुटूंबातील सर्वच मुला-मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेअंतर्गत शिक्षण फी, परिक्षा फी व निर्वाह भत्याचा लाभ दिला जातो.
किमान शिक्षणासाठी तरी आर्थिक स्थिती अडचण ठरु नये, यासाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. २०१४-१५ या गेल्या वर्षात एकूण २८ हजार ७६४ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ततीचा लाभ देण्यात आला. शिष्यवृत्ती वाटपाची एकूण रक्कम २९ कोटी ८३ लाख इतकी आहे.
वाटप करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमध्ये अनुसूचित जातीच्या तीन हजार ४३७ विद्यार्थ्यांना आठ कोटी आठ लाख, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आठ हजार ६५७ विद्यार्थ्यांना सात कोटी ४८ लाख, विशेष मागास प्रवगार्तील २६६ विद्यार्थ्यांना ३४ लाख ४३ हजार तर इतर मागास वगार्तील १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांना १३ कोटी ९३ लाख रुपयांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा समावेश आहे.
दोन कोटी ८७ लाखांची शिक्षण व परिक्षा फी अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव या प्रवगार्तील पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण फी व परिक्षा फी चा लाभ दिला जातो. जिल्ह्यात एकूण एक हजार ४३१ विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. शिष्यवृत्तीची रक्कम दोन कोटी ८७ लाख इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीच्या ४२९ विद्यार्थ्यांना ५२ लाख ४७ हजार, विजाभजच्या ५२५ विद्यार्थ्यांना एक कोटी ७७ लाख ६० हजार व इमाव प्रवगार्तील ४७७ विद्यार्थ्यांना ५७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)