साडेचार लाख अभिलेख्यांचे स्कॅनिंग
By Admin | Updated: April 7, 2016 02:31 IST2016-04-07T02:31:24+5:302016-04-07T02:31:24+5:30
राष्ट्रीय भूमिअभिलेख नूतनीकरण उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंगची प्रक्रिया पार पडली आहे.

साडेचार लाख अभिलेख्यांचे स्कॅनिंग
डिजीटायझेशन : दारव्हा येथे सहज उपलब्ध होणार दस्तावेज
दारव्हा : राष्ट्रीय भूमिअभिलेख नूतनीकरण उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंगची प्रक्रिया पार पडली आहे. दारव्हा तहसील कार्यालयाचेही डिजीटायझेशन झाले असल्याने नागरिकांना वेळेत व आवश्यक प्रत्येक दस्तावेज उपलब्ध होणार आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रकाश राऊत, नायब तहसीलदार बी.पी. जाधव यांनी रेकॉर्ड किपर तथा कनिष्ठ लिपिक एस.एस. हिरास यांनी रेकॉर्ड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर नेले आहे.
अलिकडे शासकीय कार्यालयातून दस्तावेजाच्या
प्रमाणित प्रती मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने महसूल विभागातील दस्तावेज स्कॅनिंग करून त्यांचे डिजीटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व
तहसील कार्यालयातील प्रत्येक अभिलेख्याचा कागद स्कॅन करण्यात आला आहे.
दारव्हा तहसील अंतर्गत चार लाख ६४ हजार ८९२ अभिलेख पानांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. नायब तहसीलदार तथा अभिलेख अधिकारी बी.पी. जाधव यांच्या नियंत्रणात स्कॅनिंगसाठी कार्व्ही डाटा मॅनेजमेंटचे जिल्हा समन्वयक अभिजित जयसिंगपुरे, पर्यवेक्षक गौरव मानकर यांच्यासह चंद्रशेखर साखरकर, जगदीश बेले, दासूल जाधव, प्रफुल्ल वाडेकर, प्रकाश वाघाये यांनी स्कॅनिंगची कामे पूर्ण केली. स्कॅनिंग झालेल्या अभिलेख्यांमध्ये हक्क नोंदणी रजिस्टर पेरेपत्रक, सात बारा, फेरफार आदी बाबींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)