सावरखेडाला वादळाने झोडपले

By Admin | Updated: May 29, 2015 00:09 IST2015-05-29T00:09:14+5:302015-05-29T00:09:14+5:30

तालुक्याच्या सावरखेडासह सहा ते सात गावांना बुधवारी वादळाने झोडपले. अशातच पाऊस आणि तुरळक गारा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Sawarkheda stormed the storm | सावरखेडाला वादळाने झोडपले

सावरखेडाला वादळाने झोडपले

पावसाची हजेरी : शाळा आणि घरांवरील छत उडाले, वीज खंडित
राळेगाव : तालुक्याच्या सावरखेडासह सहा ते सात गावांना बुधवारी वादळाने झोडपले. अशातच पाऊस आणि तुरळक गारा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सावरखेडा गावातील ३० ते ३५ घरांवरील छत उडाले. शाळेच्या इमारतीवरीलही टीनपत्रे उडून गेले. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नाही.
बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वारा, पावसाच्या सरी आणि गारपिटीला सुरुवात झाली. तब्बल अर्धातास वादळ सुरू होते. यामुळे सावरखेडा येथील प्रताप राठोड, मैनाबाई रामगडे, सुधाकर मेश्राम, लक्ष्मण दुधकोहळे, विनायक परचाके, विनायक टिकले आदींच्या घरावरील टीनपत्रे उडाली. काहींची घरे तर जमीनदोस्त झाली. खुशालराव मानकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि आदिवासी आश्रमशाळेच्या स्वयंपाक घरावरील छत उडाले. वाऱ्यामुळे पडलेले झाड प्रवीण झाडे यांच्या मोटरसायकलवर कोसळले. झाड विद्युत तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. लगतच्या सखी येथील बाबाराव नेहारे यांचे दोन बैल वीज पडल्याने जागीच ठार झाले.
सुबान हेटी येथे विनायक रामगडे यांच्या घरावरील टीनावर ठेऊन असलेला दगड पडल्याने त्यांची आई जखमी झाली. दरम्यान तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी या गावाला भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sawarkheda stormed the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.