सावरगाव अद्ययावत आरोग्य केंद्राचे लोकार्पण
By Admin | Updated: February 20, 2016 00:21 IST2016-02-20T00:21:51+5:302016-02-20T00:21:51+5:30
सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सावरगाव अद्ययावत आरोग्य केंद्राचे लोकार्पण
कळंब : सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.अशोक उईके, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक तथा सरपंच आनंदराव जगताप, कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, उपाध्यक्ष सुदाम पवार, पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर ढोले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, कळंबचे उपनगराध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, सरपंच इंदूताई कोरले, पंचायत समिती सदस्य विजय सुटे, तिलोत्तमा मडावी, उपअभियंता मनोहर शहारे, सेवानिवृत्त उपअभियंता शरद राघमवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील १० सरपंचांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सरपंच इंदूताई कोरले यांनी केले. संचालन कैलास राऊत तर, आभार पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत देशमुख यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगला उईके, शाखा अभियंता विलास चावरे, शाखा अभियंता अशोक कयापाक, परवेझ काझी, बेबी जाधव, नीलेश बोभाटे, आशिष देशमुख, किशोर जगताप, ग्रामसेवक प्रियांक घोडे, सचिन डफरे, दिलीप अग्रवाल आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)