सत्यशोधक यवतमाळकर झाले सद्भावना पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: September 8, 2016 00:58 IST2016-09-08T00:58:21+5:302016-09-08T00:58:21+5:30
संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने

सत्यशोधक यवतमाळकर झाले सद्भावना पुरस्काराने सन्मानित
मान्यवरांची उपस्थिती : रफिक पारनेर यांच्या व्याख्यानातून प्रबोधन
यवतमाळ : संपूर्ण देशामध्ये अमन, शांती, भाईचारा निर्माण व्हावा या दृष्टीने जनजागृती करण्याकरिता जमाते-एस्लामे-हिंद या संघटनेच्यावतीने स्थानिक भावे मंगल कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या अमन, शांती कुणासाठी, कशासाठी या संदर्भात डॉ. रफिक पारनेर (अहमदनगर) यांचे व्याख्यान झाले.
यामध्ये आपले संपूर्ण जीवन एकमेकांच्या सहकार्यानेच विकासाच्या दिशेने जाण्याचे ध्येय निश्चित केलेले सत्यशोधक गोलमेज परिषदेचे डॉ. ज्ञानेश्वर गोबरे, आदिवासींच्या हक्कासाठी सत्यशोधक भूमिका मांडून संघर्ष निर्माण करणारे आदिवासी मुक्ती दलाचे प्रा. माधव सरकुंडे, भारतीय पिछडा शोषित संघटना, डॉ. बाबासाहेब नंदूरकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश नंदूरकर, अॅड. जयसिंग चव्हाण, आॅल इंडिया कौमीन तजीम के मोहमद असीम अली यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, समितीचे सचिव पंडित दिघाडे, अध्यक्ष पप्पू भोयर, सदस्य डॉ. विजय चाफले, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन एजाज जोश, जिया अहेमद यांनी केले, तर रियाजभाई यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)