सारिका शाह सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 21:03 IST2018-01-09T21:02:50+5:302018-01-09T21:03:19+5:30
दिल्ली येथे गृह सहेलीतर्फे मिस आणि मिसेस इंडिया-२०१७ ही स्पर्धा घेण्यात आली.

सारिका शाह सन्मानित
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : दिल्ली येथे गृह सहेलीतर्फे मिस आणि मिसेस इंडिया-२०१७ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये येथील डॉ.सारिका महेश शाह यांना गृह सहेली मिसेस इंडिया-२०१७ ने सन्मानित करण्यात आले.
विविध परिधान, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे, बौद्धिक क्षमता, पर्सनॅलिटी, कॉन्फीडन्स, जनरल अवेअरनेस या सर्व बाबींमध्ये यशस्वी होत सेकंड रनरअपच्या त्या मानकरी ठरल्या. सोबतच त्यांना मिसेस बेस्ट/आयकॉनिक आयचे सब टायटल प्राप्त झाले आहे. या स्पर्धेच्या जुरीमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटीज, हरियाणाचे प्रसिद्ध सिंगर के.डी. सिंग यांच्यासह राजू ढिंगरा आदींचा समावेश होता. मिसेस कॅटॅगिरीमध्ये देशभरातून केवळ दहा महिलांचा सहभाग होता. त्यातून डॉ.सारिका शाह सेकंड रनअप पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. त्या आपल्या यशाचे श्रेय डॉ.महेश शाह आदींना देतात.